नवोदित लेखकांनी चांगले आणि उत्कृष्ट साहित्य लिहावे म्हणून बुक्सट्रक प्रयत्नरत आहे. संपूर्ण देशभरातून आम्ही प्रयत्न करून नवोदित लेखकांना हेरतो आणि त्यांच्या साहित्याला व्यासपीठ निर्माण करून देतो. अनेक लेखक आणि लेखिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे आणि आपले साहित्य आमच्या व्यासपीठावर प्रकाशित केले आहे म्हणून आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत.
२०२१ मध्ये आम्ही अश्याच विशेष साहित्यिकांना पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हे पुरस्कार फक्त उत्कृष्ट दर्जाचे साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांनाच देण्यात येईल आणि अतिशय काळजीपूर्वक आम्ही त्यांना निवडू.
पहिला पुरस्कार गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर आम्ही श्री निमिष नवनीत सोनार ह्यांना दिला आहे. निमिष ह्यांनी अनेक प्रकारचे लेखक केले असले तरी विज्ञानकथा ह्या प्रकारचे साहित्य त्यांचे उल्लेखनीय आहे. डिटेक्टिव्ह निगेटिव्ह हि त्यांची कादंबरी अत्यंत लोकप्रिय असून विज्ञान आणि सुपरहिरो ह्या दोन्ही गोष्टींची चांगली सांगड घालते.
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह आपण इथे वाचू शकता : https://bookstruck.app/book/2956
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह आपण इथे ऐकू शकता : https://www.youtube.com/playlist?list=PL3b5C5GmPJolxNZzL9dD2Z54T_L--OSX_
सर्व वाचकांना विनंती आहे कि त्यांनी प्रतिक्रिया देऊन वाचकांचा हुरूप वाढवावा.
मला या site वर लिहायचं असेल तर काय करू?
bravo